मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने दीड किलोमीटर पायी चालत गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

Published : Feb 16, 2024, 01:01 PM ISTUpdated : Feb 16, 2024, 01:03 PM IST
mumbai airport

सार

न्यूयॉर्क येथून मुंहईत आलेल्या एका 80 वर्षीय वृद्धाला मुंबई विमानतळावर व्हील चेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खरंतर, व्यक्ती आपल्या पत्नीसोबत मुंबईत आला होता.

Mumbai Airport : मुंबईत विमानतळावर न्यूयॉर्क (New York) येथून एक जेष्ठ कपल आले होते. या कपलला व्हील चेअर हवी होती पण एकच मिळाली. यामुळे व्यक्तीने आपल्या पत्नीला व्हील चेअरवर बसवले आणि स्वत: दीड किलोमीटर पायी चालत गेले. या दरम्यान, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आले होते
जेष्ठ कपल एअर इंडियाच्या विमानाने (Air India) न्यूयॉर्क येथून मुंबईत आले होते. या दोघांना व्हील चेअर दिली जाणार होती. कारण या दोघांनी सीट देखील व्हील चेअरची बुक केली होती. पण मुंबई विमानतळावर व्हील चेअरच्या तुटवड्यामुळे त्यांना एकच व्हील चेअर मिळाली. या व्हील चेअवर व्यक्तीने आपल्या पत्नीला बसवले आणि स्वत: दीड किलोमीटर पायी चालत गेले. यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

नानावटी रुग्णालयात झाला मृत्यू
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर व्यक्तीला तातडीने रुग्णालयात वैद्यकिय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पण नानावटी रुग्णालयात उपचारादरम्यान जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला व्यक्ती भारतीय असल्याचे सांगितले जात असून त्यांचा पासपोर्ट अमेरिकेचा होता.

आणखी वाचा : 

'माझ्या बॅगेत बॉम्ब आहे...' IndiGo च्या विमानातील टिश्यू पेपरवर लिहिलेल्या मेसेजने खळबळ

Viral Video : ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील कर्मचाऱ्याचा संतापजनक प्रकार उघडकीस, कुत्र्याला ग्रुमिंगच्या नावाखाली मारहाण

मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतवासाला कार्यालय उडवून देण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल

PREV

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!