मी आत्महत्या करतोय...वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारत जेष्ठ नागरिकाची आत्महत्या

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक येथून उडी मारत एका जेष्ठ नागरिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्याआधी व्यक्तीने मुलाला फोन करुन याची माहिती दिली असेही सांगितले जात आहे.

Mumbai : मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन 56 वर्षीय भावेश सेठ नावाच्या व्यक्तीने उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येआधी वरळी सी-लिंकवर भावेश सेठने आपली कार थांबवत समुद्रात उडी मारली. पोलिसांना सदर प्रकरणात एक सुसाइट नोट भावेश सेठ यांच्या कारमधून सापडली आहे. पोलिसांना व्यक्तीने सी-लिंकवरुन उडी मारल्याची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने दाखल होत भावेश सेठ यांचा शोध सुरु केला.

नक्की काय घडले?
सदर घटनेबद्दल अशी माहिती दिली जात आहे की, भावेश सेठ यांनी वांद्रे-वरळी सी-लिंकवर आपली कार थांबवली. यानंतर समुद्रात उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी भावेश सेठ यांनी मुलाला फोनही केला होता. याशिवाय पोलिसांना सुसाइड नोटही मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावेश सेठ आपल्या टोयोटा कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवर पोहोचले. येथे आल्यानंतर भावेश यांनी मुलाला फोन केला. फोनवर मुलाला मी आत्महत्या करतोय असेही सांगितले. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थितीत आहेत.

दरम्यान, वांद्रे-वरळी सी-लिंकला सुसाइट पॉइंट मानले जाते. येथे आजवर अनेक व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या संबंधित मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका देखील दाखल करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने राज्य सरकारकडे उत्तर मागितले होते. याशिवाय सी-लिंकवर सीसीटीव्ही कॅमेरे लावत सुरक्षिततेत अधिक वाढ केली होती.

मरीन ड्राइव्हरही तरुणीची आत्महत्या
वांद्रे-वरळी सी-लिंकच्या घटनेच्या दोन दिवस आधी मरीन ड्राइव्ह येथे एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. सदर घटना 15 जुलैला घडली आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी मृत मतत कदम तरुणीने समुद्रात उडी मारत आपला जीव दिला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तरुणीने समुद्रात उडी मारण्याआधी आपली बॅग बाहेरच ठेवली. बॅगमध्ये मिळालेल्या ओखळपत्रावरुन तिची ओखळ पटवण्यात आली. मृत ममताचे वय 23 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे. ती एका आयटी कंपनीत नोकरी करत होती. ममता आत्महत्या करण्याच्या दिवशी घरी कामावर जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली होती. याचवेळी ममताने मरीन ड्राइव्ह येथे जीव दिला. या प्रकरणात मृत तरुणीने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले हे समोर आलेले नाही.

आणखी वाचा : 

महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबईसाठी हवामान खात्याचा ऑरेंज अ‍ॅलर्ट

मुंबई मेट्रो-3च्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला, तावडेंनी ट्विट करुन दाखवली पहिली झलक

Share this article