एअर इंडियामध्ये जॉबसाठी २५,००० तरुण एकावेळी आल्यामुळे कंपनीची तारांबळ उडाली. अचानक हे सर्व घडल्यामुळे कंपनीने उपस्थित तरुणांचे फक्त सीव्ही घेऊन त्यांना परत पाठवून दिले.
एअर इंडियामध्ये जॉब मिळवण्यासाठी २५,००० पेक्षा जास्त बेरोजगार तरुणांनी गर्दी केल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. कंपनीने हॅडीमॅन पदासाठी ही ओपनिंग काढल्याचे दिसून आले आहे. यावेळी मुलाखत घेतल्या जाणाऱ्या ठिकाणी जास्त मुलांनी गर्दी केली होती. या पोस्टमध्ये प्रामुख्याने रिपेअर आणि मेंटेनन्स वर्क पूर्ण केले जाते. यावेळी येथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे कंपनी प्रशासनाकडून फक्त रिज्युम घेऊन सर्वांना जायला सांगण्यात आले.
किती मिळणार होता पगार -
एखाद्या तरुणाची यामध्ये निवड झाली असती तर त्याला कंपनीच्या वतीने २०,००० ते २५,००० च्या दरम्यान पगार देण्यात येणार होता. या जॉबमध्ये प्रामुख्याने शारीरिक स्वरूपाची कामे करावी लागत होती. यावेळी अतिरिक्त काम केल्यास जास्त पगार दिला जाईल असे सांगण्यात आले असून तो ३०,००० पर्यंत मिळू शकतो असे म्हटले आहे. उमेदवार हा शारीरिकदृष्टया सक्षम असायला हवा असे यामध्ये म्हणण्यात आले आहे.
या व्हिडीओवरून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि एनडीए आघाडीवर टीका केली जात आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यांनी नोकऱ्या न दिल्यामुळे बेरोजगार तरुणांना अशा प्रकारे नोकऱ्या शोधाव्या लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा -
Baramati Accident : बारामतीत पालखी महामार्गावर टायर फुटल्याने कारचा अपघात, १ ठार
Nashik News : निफाडमधील धक्कादायक बातमी, सख्ख्या भावाने जमिनीच्या वादातून अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जिवंत जाळले