सांगली लोकसभा मतदारसंघावरून वाद पेटल्याचे सध्याच्या घडीला दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट जाहीर केले
सांगली लोकसभा मतदारसंघावरून वाद पेटल्याचे सध्याच्या घडीला दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाने सांगलीत पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट जाहीर केले आणि त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं सध्याच्या घडीला दिसून येत आहे. त्यांच्या प्रचारासाठी संजय राऊत यांनी सांगली येथे सभा घेतली. येथून काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक होते.
विशाल पाटील यांचे ‘ते’ ट्विट चर्चेत -
विशाल पाटील यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक ट्विट टाकले असून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यांनी यामध्ये "सांगली ही काँग्रेसचीच आहे आणि ती आपण सोडायची नाही". असा उल्लेख केला. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरूपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला असं म्हटले आहे. सांगलीच्या भविष्यासाठी आपण सर्वजण लढण्यासाठी तयार झाले आहोत असं त्यांनी म्हटलं आहे.
येथून आपण लढू आणि जिंकून दाखवू असे विशाल पाटील म्हटले आहेत. विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते पण येथून चंद्रहार पाटील यांना तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनात त्यांनी दिल्लीपर्यंत लढा दिला पण त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. आता ते लोकसभेला उभे राहतात का नाही याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा -
Israel Iran War : गाझा नंतर आता इस्रायल इराण संघर्ष पेटला ! युद्धजन्य परिस्थिती ,इस्रायलमध्ये जीपीएस आणि नेव्हिगेशन यंत्रणा बंद
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंना देतेय कठोर लष्करी प्रशिक्षण, खेळाडू लढणार की खेळणार?