महाराष्ट्रात दोन लोकसभा उमेदवारांनी कॉइन एक आणि दोन रुपयांचे कॉइन आणून भरले उमेदवारी अर्ज, कोण आहेत उमेदवार?

लोकसभा निवडणुकीच्या काळात दरवेळी वेग वेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या काळात दरवेळी वेग वेगळ्या गोष्टी घडताना आपल्याला दिसून येत आहे. निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध होण्यासाठी कधी कोण काय करेल हे सांगता येत नाही. यवतमाळमधील मनोज गेडाम यांनी निवडणुकीसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी कॉइन आणल्याचे उदाहरण दिसून आले आहे. त्यांनी बारा हजार पाचशे रुपये भरण्यासाठी 2 रुपयांची नाणी आणली होती. 

गेडाम यांनी नेमकं केलं काय? 
बुलढाण्यात अस्लम शेख यांनी दहा हजार रुपयांचे नाणे असलेले पैसे आणले होते. गेडाम हे यवतमाळ वाशीम मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. त्यांची परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. त्यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी कॉइन आणल्यामुळे येथील अधिकाऱ्यांची धांदल उडाली होती. बुलढाण्यात उमेदवाराने याची कॉपी केल्याचे दिसून आले. 

अस्लम शेख यांनी काय केलं? 
चिल्लर नाटकाचा सिन बुलढाणा येथे दिसून आला. येथे अस्लम शेख यांनी दहा हजारांची नाणी आणि पंधरा हजारांची रोख रक्कम घेऊन पोहचताच उत्सुकता पसरली होती. इतक्या रकमेच्या नाण्यांची रक्कम मोजायची कशी हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार या नाण्यांची रक्कम जिल्ह्यातील समर्थकांकडून गोळा करण्यात आली होती. 
आणखी वाचा - 
कुख्यात गँगस्टर अरुण गवळी जेल मधून बाहेर येणार ? पण ते प्रकरण काय आणि त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय ? जाणून घ्या
मेक्सिकोमध्ये TikTok स्टारसह प्रियकराची हत्या, कपलवर झाडल्या 26 गोळ्या

Share this article