लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागा वाटपाचा तिढा कायम आहे. अशातच सांगतीची जागा शिवसेनेचीच आहे. यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातील काहीजणांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावरच खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे. पण अद्याप महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. याशिवाय सांगतील (Sangali) जागा शिवसेनेनीच (Shiv Sena UBT) असल्याचे म्हटले जात असल्याने काँग्रेसमधील (Congress) काहीजणांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, "संपूर्ण महाराष्ट्रातच महाविकास आघाडीच्या प्रचाराला लागलो आहोत. 48 जागांसाठी आम्ही पाहत नाही उमेदवार शिवसेनाचा आहे, शरद पवारांच्या गटाचा आहे की काँग्रेस पक्षाचा आहे. आमच्यासाठी प्रत्येक उमेदवार महाविकास आघाडीचा आहे. लोकसभेच्या 48 जागा काँग्रेस किंवा शिवसेना नव्हे महाविकास आघाडीशी संबंधित आहे. शिवसेनेने 48 जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पण काहींमध्ये शिवसेनेला सांगलीची जागा मिळाल्याने राग असू शकतो. कोल्हापूर आणि अमरावतीची जागा आमची होती. पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. सांगलीतील जागेवरून काँग्रेसमधील काहीजण नाराज असल्यास पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यांना सांगितले पाहिजे. आम्ही सांगलीची जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू."
शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. पक्षाने 27 मार्च लोकसभा निवडणुकीसाठी 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा करत यादी जाहीर केली होती. उद्धव ठाकरे यांच्या गटातील अनिल देसाई यांना मुंबई दक्षिण-मध्य जागेवरून तिकीट दिले आहे. याशिवाय पक्षाने मुंबई दक्षिण येथून अरविंद सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.
आणखी वाचा :
Lok Sabha Election 2024 : 'आम्ही राज्यात 45 पेक्षा अधिक जागा जिंकणार', उदय सामंत यांचा दावा