तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, नंतर वडिलांचा मृत्यू; आईला आला हृदयविकाराचा झटका

Published : Jun 13, 2025, 09:33 PM IST
sucide

सार

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील बोरगाव येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांचा तडफडून मृत्यू झाला, तर आईला हृदयविकाराचा झटका आला. ऋणबाजारीपणाला कंटाळून ३० वर्षीय अमोल सुरमाळे याने आत्महत्या केली.

नांदेड | प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यातील एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या वडिलांचा तडफडून मृत्यू झाला, तर आईला देखील तीव्र मानसिक धक्क्याने हृदयविकाराचा झटका आला. संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर तिहेरी दु:ख ओढवलं आहे.

धक्कादायक प्रकार हि घटना भोकर तालुक्यातील बोरगाव येथील आहे. ऋणबाजारीपणाला कंटाळून अमोल गणपत सुरमाळे या ३० वर्षीय शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केली. मुलाचा मृतदेह पाहताच वडील गणपत सुरमाळे यांनी प्राण सोडले. एवढ्यावरच थांबले नाही, तर या दुहेरी आघातामुळे आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या संपूर्ण घटनेमुळे जिल्ह्यात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबाच्या व्यथा आणि ग्रामीण भागातील आत्महत्येचं संकट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे द्यावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!