शनिशिंगणापूर मंदिर वाद, मुस्लिम कर्मचाऱ्यांना कामावरून टाकले काढून

Published : Jun 13, 2025, 05:51 PM ISTUpdated : Jun 13, 2025, 06:52 PM IST
shani shingapur

सार

शनिशिंगणापूर मंदिर प्रशासनाने काही मुस्लिम कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. हिंदू संघटनांच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून, धार्मिक सहिष्णुतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

अहमदनगर | शनिशिंगणापूर मंदिर प्रशासनाने घेतलेल्या एका निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंदिर प्रशासनाने अलीकडेच काही मुस्लिम कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणल्याचे स्पष्ट झाले असून, हा निर्णय हिंदू संघटनांच्या दबावाखाली घेण्यात आल्याचा आरोप होत आहे. मंदिरात कार्यरत असलेल्या मुस्लिम कर्मचाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात ३० टक्क्यांवरून केवळ १० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे, असे सांगण्यात येते.

या पार्श्वभूमीवर धार्मिक सहिष्णुतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, विविध सामाजिक संघटनांनी मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तर मंदिर ट्रस्टने मात्र हा निर्णय सेवाभावी आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन घेतल्याचे स्पष्ट केले आहे. तथापि, हा विषय आता केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित राहिलेला नसून राज्यभरात त्यावर टीका आणि चर्चा रंगू लागली आहे.

या निर्णयामुळे धर्मनिरपेक्षतेविरोधी भावना निर्माण झाली असून समाजातील विविध स्तरातून नाराजीची लाट निर्माण झाली आहे. राज्यभरात या विषयावर वाद विवाद निर्माण झाले आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!
‘आवडेल तिथे प्रवास’ आता आणखी स्वस्त! एसटी महामंडळाकडून पास दरात मोठी कपात, जाणून घ्या नवे दर