रोहित पवारांनी मिसिंग लिंकबाबत घेतलं 'या' दोन कंपन्यांचं नाव, कारवाई करण्याची केली मागणी

Published : Jul 07, 2026, 05:23 PM IST
rohit pawar

सार

मुंबई-पुणे महामार्गावरील 'मिसिंग लिंक'च्या बोगद्याला तडे जाऊन पाणी गळत असल्याने रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे. हा मिसिंग लिंक नसून 'करप्शन लिंकिंग' असल्याचा आरोप करत, त्यांनी नवयुगा आणि ॲफकॉन्स कंपन्यांवर कारवाईची मागणी केली.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला झाला. त्यामुळं मुंबई, पुणे आणि मिसिंग लिंकवर नागरिकांची तारांबळ उडाली आहे. यावेळी मिसिंग लिंक दुर्दशेबाबत रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. या प्रकल्पाचे काम करणाऱ्या नवयुगा इंजिनिअरिंग आणि ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांवर तातडीची कारवाई करण्याची मागणी रोहित यांनी केली.

काय म्हणाले रोहित पवार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकचे उदघाटन करताना हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी त्यावेळी राजकीय भूमिका मांडली होती. कामाचा दर्जा हा क्वालिटी असायला हवा यावर रोहित पवार यावेळी बोलले. दोन महिन्यांपूर्वी उदघाटन करण्यात आलेल्या या टनेलची म्हणजेच बोगद्याची दुर्दशा झाली.

आतून पाण्याचे फवारे उडत आहेत 

बोगद्यामध्ये तडे पडले असून आतून बाहेर पाण्याचे फवारे उडत आहेत. त्यामुळं हा मिसिंग लिंक करप्शन लिंकिंग असल्याचं यावेळी बोलताना रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारने नवयुगा आणि ॲफकॉन्स या कंपन्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी रोहित यांनी केली. आता मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक