Ketan Agarwal Death Case : सिया-चेतनने चार महिने आधीच लग्न केलेलं? पोलीस तपासात मोठी माहिती समोर

Published : Jul 07, 2026, 02:57 PM IST
Ketan Agrawal Case Siya Goyal Chetan Chaudhary

सार

Ketan Agarwal Lohagad Fort Case : केतन अग्रवाल याच्या हत्येआधी सिया आणि चेतन यांनी गुपचूप केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोघांनी चार महिने आधीच लग्न केल्याचं बोललं जात आहे. 

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल याची १८ जून रोजी लोहगडावरुन ढकलून हत्या करण्यात आली. त्याच्या होणाऱ्या पत्नीने सिया गोयलने त्याला संपवलं. सियाचं चेतन चौधरी या तरुणावर प्रेम होतं. सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतनची हत्या केली. याप्रकरणी दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी होत आहे. चौकशीदरम्यान पोलीस तपासात सिया आणि चेतन यांनी गुपचूप लग्न केल्याचं समोर आलं असल्याची माहिती आहे.

सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींच्या मोबाईल फोन, व्हॉट्सअॅप चॅटमधून दोघांनी लग्न केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी चौकशीदरम्या दोघांचे कॉल रेकॉर्ड, इंटरनेट हिस्ट्री, व्हॉट्सअॅपवरुन डिलीट केलेला डेटा, त्यांचे लोकेशन, कॉल रेकॉर्डिंग अशा मागील सा ते आठ महिन्यांचा डेटा तपासून सखोल पडताळणी केली. यातून सिया आणि चेतन यांनी चार महिने आधी गुपचूक लग्न केल्याचं पोलीस तपासात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा १९ फेब्रुवारी रोजी साखरपुडा झाला होता. या तारखेच्या जवळपासच दोघांनी लग्न केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पोलिसांच्या तपासात अतिशय धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. दोघांचे फोन, इंटरनेट हिस्ट्री आणि इतर तांत्रिक बाबी तपासल्यानंतर दोघांनी केतनची हत्या करण्यासाठी अनेक वेब सीरिज, पॉडकास्ट पाहिल्याचं समोर आलं आहे. कोणतंही शस्त्र वापरल्या किंवा इतर कोणत्याही गोष्टीने त्याची हत्या केल्यास त्याचे पुरावे मिळू शकतात. तसंच नंतर त्या गोष्टी नष्ट कराव्या लागतील किंवा पुन्हा लपवाव्या लागतील. यामुळे हत्येनंतर पकडले जाऊ शकतो. मात्र त्याला उंचावरुन ढकललं तर कोणताही पुरावा मागे राहणार नाही. असा विचार करत दोघांनी लोहगडावर जाण्याची योजना आखली. कोणत्याही शस्त्राचा वापर न करता केतनला उंच कड्यावरुन ढकललं तर कोणताही पुरावा मागे राहणार नाही याच हेतून त्यांनी उंच जागा निवडली आणि केतन प्लॅन करुन लोहगडावरुन ढकललं.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक