नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कुठं करायचंय? मुंबई, पुण्यापासून जवळच असणारी ही ठिकाणं घ्या माहित करून

Published : Dec 02, 2025, 10:54 AM IST

मुंबई आणि पुण्याजवळ नवीन वर्ष साजरे करण्यासाठी अनेक उत्तम ठिकाणे आहेत. या लेखात लोणावळा, पवना तलाव, माथेरान, तापोळा आणि भीमाशंकर यांसारख्या ठिकाणांची माहिती दिली आहे, जिथे तुम्ही पार्टी, कॅम्पिंग आणि निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकता.

PREV
16
नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कुठं करायचंय? मुंबई, पुण्यापासून जवळच असणारी हि ठिकाण घ्या माहित करून

मुंबई आणि पुणे येथून जवळच काही ठिकाण असे आहेत जिथं जाऊन आपण नवीन वर्ष साजरे करू शकता. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आपण अशाच ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात.

26
लोणावळा

लोणावळा हे ठिकाण पुणे आणि मुंबई येथून अतिशय जवळ आहे. या ठिकाणी गेल्यानंतर अनेक रिसॉर्ट आणि हॉटेल्स असून त्या ठिकाणी आपण नवीन वर्षाच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. येथे गेल्यानंतर आपण कॅम्पिंगचा अनुभव घेऊ शकता.

36
पवना तलाव

आपण पवना तलाव येथे गेल्यानंतर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करू शकता. येथे गेल्यानंतर आपल्याला सनसेट सहजपणे पाहू शकता, त्यानंतर आपल्याला याठिकाणी गेल्यानंतर कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.

46
माथेरान

माथेरान हे ठिकाण हिलस्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. माथेरान हे ठिकाण जंगल आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालं आहे. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट आणि लुईसा पॉइंटसारख्या ठिकाणांचं आनंद घेऊ शकता.

56
तापोळा

पुणे आणि मुंबई येथून जवळच तापोळा हे ठिकाण आहे. पाचगणी आणि महाबळेश्वरच्या पुढं तापोळा हे ठिकाण मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जात. येथून सनराईज अतिशय सुंदर दिसून येत असतो.

66
भीमाशंकर

भीमाशंकर हे ठिकाण नवीन वर्ष साजरे करण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. आपण महादेवाचे दर्शन घेऊन दिवसाची दमदार सुरुवात करू शकता. इथला निसर्ग पाहण्यासारखा असून अभयारण्य असून ते आपण पाहू शकता.

Read more Photos on

Recommended Stories