मुंबई : उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी राज्यात गारठा प्रचंड वाढला आहे. 1 आणि 2 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने कोल्ड वेव्हचा अलर्ट जारी केला आहे. थंडीच्या तीव्रतेमुळे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या सात जिल्ह्यांना थेट इशारा देण्यात आला आहे.