Rain Upadate: आज कुठं मुसळधार पाऊस पडणार, या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

vivek panmand   | SIGWIRE
Published : Jul 25, 2026, 05:12 PM IST
Mumbai monsoon

सार

कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने विदर्भासह या भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम राहिला आहे. आता पावसाच्या सरी काही भागात कोसळत आहेत. काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरु झाला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पाऊस मोठ्या प्रमाणावर कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

मुसळधार पाऊस कुठं पडणार? 

आज पुणे घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सातारा घाटमाथा आणि कोकणच्या काही भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा, कोल्हापूर, पालघर, ठाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय.

रेड अलर्ट कुठं केला जारी? 

रेड अलर्ट हा पुणे घाटमाथ्यावर जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवसांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं पाऊस पाडण्याचं प्रमाण वाढू शकत असं सांगण्यात आला आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'