महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार बिजेंद्र गुप्ता बिहारमधून अटकेत; तपासाला मोठी गती

Published : Jul 25, 2026, 01:53 PM IST
maharashtra tet paper leak mastermind arrested bihar bhivandi police 13 accused

सार

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई करत भिवंडी पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक केली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या गुप्ताला पुणे विमानतळावर आणण्यात आले आहे. पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि चौकशीसाठी त्याला भिवंडीत नेण्यात येणार आहे. या अटकेमुळे पेपरफुटी रॅकेटचा संपूर्ण पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात

भिवंडी पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या कारवाईत बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली. तपास यंत्रणेनुसार, तो महाराष्ट्र TET-2026 पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असून दीर्घकाळापासून फरार होता.

यापूर्वी तिघांसह 10 आरोपींना अटक

यापूर्वी SIT ने उत्तर प्रदेशातील आग्रा येथील छपाई प्रेसमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली होती. नरेशकुमार पुरणचंद महोरे (35), संजयकुमार सुरेशचंद्र चंद्रा (44) आणि बाबूलाल नारायणसिंग कुशवाहा (45) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दिल्लीहून ताब्यात घेऊन भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

छपाईदरम्यानच प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप

तपासानुसार, नरेशकुमार महोरे याने छपाई प्रक्रियेदरम्यान गोपनीय प्रश्नपत्रिका बाहेर काढून ती माजी कर्मचारी संजय कुमार शर्मा आणि फरार आरोपी सोनू कुमार यांच्याकडे दिली. त्यानंतर या दोघांनी ही प्रश्नपत्रिका बिजेंद्र गुप्ता याच्यापर्यंत पोहोचवल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, संजय शर्मा आणि सोनू कुमार हे दोघेही याच छपाई प्रेसमध्ये पॅकेजिंग विभागात कार्यरत होते. त्यामुळे छपाई प्रक्रियेची त्यांना चांगली माहिती होती आणि त्याचाच गैरफायदा घेत प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

आर्थिक व्यवहार आणि कटाचा तपास सुरू

सरकारी वकील सुमित जाधव यांनी सांगितले की, आरोपींचे बिजेंद्र गुप्तासोबतचे संबंध प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी मिळालेली रक्कम आणि संपूर्ण कटातील त्यांची भूमिका याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

एका आरोपीकडून जिवंत काडतुसे जप्त

या प्रकरणातील एका आरोपीकडून तीन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. भिवंडीचे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) विजय मराठे यांनी सांगितले की, ही काडतुसे आरोपीकडे कशी आली आणि त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने होणार होता, याचाही तपास सुरू आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'