महाराष्ट्रात कधी होणार पाऊस, हवामान विभागानं वर्तवला हा अंदाज

vivek panmand   | SIGWIRE
Published : Jul 25, 2026, 10:15 PM IST
maharashtra monsoon

सार

हवामान विभागाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे २८ जुलैपासून राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या काळात जोरदार वारे वाहणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठं वादळ येत चाललं आहे. हवामान विभागानं त्यामुळं रेड अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळं पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २८ जुलैपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल असं सांगण्यात आलं आहे.

कुठं दिला येलो अलर्ट 

रत्नागिरी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात ताशी ७५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब,झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात झाला नाही

पाऊस जून महिन्यात पाऊस झाला नाही. जून महिन्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला नाही. १ जुलै ते ९ जुलै राज्यात चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसात खंड पडल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळं नागरिकांना सतर्कतेच आवाहन केलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'