शरद पवारांचा पक्ष एनडीएसोबत येणार का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Published : Jul 07, 2026, 10:53 PM IST
devendra fadanvis

सार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. दरम्यान, रोहित पवार यांनीही पक्ष एनडीएसोबत जाणार नसल्याचे म्हटले असून, जयंत पाटील यांच्या भेटीच्या चर्चांमुळे राजकारण तापले आहे.

राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याची गॅरंटी नाही. त्यामुळं आता लोकांच्या तोंडात कोणता आमदार फुटला, कोणता खासदार फुटला अशाच चर्चा सुरु असतात. आता शरद पवार यांच्या पक्षात फूट पडते की काय अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

शरद पवार सोबत येणार नाहीत 

देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी या दौऱ्याबद्दलची माहिती दिली. या दिल्ली दौऱ्याच्या वेळी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार का अशी माहिती विचारण्यात आली. यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की, पवार यांचा पक्ष एनडीए सोबत येणार नाही. त्यांनी महाराष्ट्रातून कोणताही पक्ष सोबत येणार नाही असं सांगितलं.

रोहित पवार काय म्हणाले? 

रोहित पवार यांनी यावेळी एनडीए सोबत जाणार का नाही यावर आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, आपला पक्ष आता एनडीएसोबत जाणार नाही. माजी मंत्री जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. आता नेमकं यातलं खरं काय ते लवकरच आपल्यासमोर येईल.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक