१०० वर्षातील उच्चांकी पाऊस महाबळेश्वरमध्ये कोसळला, 24 तासांत 513 मिमिची नोंद

Published : Jul 07, 2026, 07:51 PM IST
Bollywood celebs who visit Mahabaleshwar during monsoon

सार

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये २४ तासांत ५१३ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे, ज्यामुळे दरडी कोसळून पाणी साचले आहे. दुसरीकडे, खंडाळा तालुक्यातील आतीट गावात ढगफुटीसदृश पावसामुळे ओढ्या-नाल्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वर: राज्यात सर्वच भागात विविध विभागात जोरदार पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाबळेश्वर सोबतच मागील २४ तासांत चांगला पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर या भागात मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये २४ तासांमध्ये तब्बल ५१३ मिलीमीटर म्हणजेच २० इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

महाबळेश्वरमध्ये झाला चांगला पाऊस 

महाबळेश्वरमध्ये चांगला पाऊस म्हणजेच अनेक ठिकाणी पाणी साचलं असून दरडी कोसळल्या आहेत. ग्रामीण भागातील घाटरस्त्यांवर मातीचे ढीग मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. इथं होणारा पाऊस नागरिकांसाठी मात्र गैरसोयीचा ठरला आहे.

खंडाळा तालुक्यात झाला ढगफुटीचा पाऊस 

खंडाळा तालुक्यात ढगफुटीचा पाऊस झाला आहे. या तालुक्यातील आतीट गावात डोंगरातून आलेल्या पाण्यामुळं ओढ्या आणि नाल्या यांना पूर आला आहे. या गावातील नदीचे पाणी घरात घुसल्यामुळं अनेकांच्या घरातील सामानाचे नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतीच काही प्रमाणात नुकसान झालं असून ग्रामस्थांनी मदत मिळावी अशी मागणी केली.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक