स्वतःचे हित साधण्यासाठी केलं पक्षांतर, बंडानंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया चर्चेत

Published : Jun 22, 2026, 11:47 PM IST
Anna hazare

सार

ठाकरे सेनेतील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खासदारांचे स्वागत करत याला बाळासाहेबांच्या विचारांचा विजय म्हटले आहे, तर अण्णा हजारे यांनी या पक्ष बदलावर टीका केली आहे.

ठाकरे सेनेतील सहा खासदारांनी आज सोमवारी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा हजारे काय म्हणाले? 

अण्णा हजारे यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अशा पद्धतीने पक्ष बदल करणे योग्य नाही. सध्याच्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं आहे. समाजासाठी काम करणारे लोक सहजपणे पक्ष बदलत नाही. हि नेते मंडळी स्वतःचे हित साधण्यासाठी पक्षांतर केले जाते. आता अण्णा हजारे याबद्दल पुढं काय करतात त्याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी खासदारांचे केलं स्वागत 

पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी ६ खासदारांचे स्वागत केलं आहे. हा खरं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना कुटुंब आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या खऱ्या शिवसेनेत हे कट्टर शिवसैनिक खासदार सामील झाले आहेत. त्यांचे मी स्वागत करतो असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

आम्ही शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला होता. त्यावेळी ४० आमदार आमच्या सोबत आले होते. आता या लढ्याचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. चौकार नाही तर यावेळी आम्ही षटकार मारला आहे. या पक्षप्रवेशानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाला आहे. या चर्चेनंतर चर्चेला नवीन वळण मिळालं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक