बंडखोर ६ खासदारांवर उबाठा पक्ष करणार कारवाई, माहिती आली समोर

Published : Jun 22, 2026, 11:06 PM IST
uddhav Thackeray

सार

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, शिवसेना उबाठा गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात असून, ठाकरे गटाने दिल्लीतील बैठकीला गैरहजर राहिलेल्या या खासदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू केली आहे.

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या पूर्णपणे ढवळून निघालं आहे. ऑपरेशन टायगरची सुरु असलेली धावपळ आता थांबली आहे. शिवसेना उबाठा गटाच्या ६ खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. हा उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आता ठाकरे गटाकडून या ६ खासदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु झाली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाईला केली सुरुवात

ठाकरेंच्या शिवसेनेनं कारवाईला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार नाराज असल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलवली. ६ खासदारांनी बैठकीला दांडी मारल्यामुळं त्यांच्या विरोधात ठाकरे यांच्या पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दिल्लीतील बैठकीला राहिले गैरहजर 

दिल्लीतील बैठकीला खासदार गैरहजर राहिले होते. त्यामुळं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे. याबाबत लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं जाणार आहे. या खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

कोणी सोडली ठाकरेंची साथ 

  • खासदार संजय जाधव – परभणी 
  • खासदार नागेश पाटील आष्टीकर – हिंगोली 
  • खासदार संजय देशमुख – यवतमाळ-वाशिम 
  • खासदार ओमराजे निंबाळकर – धाराशिव 
  • खासदार भाऊसाहेब वाकचौरे – शिर्डी 
  • खासदार संजय दिना पाटील – ईशान्य मुंबई

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक