Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला.
मुंबई: राज्यात हवामान पुन्हा एकदा बिघडण्याची शक्यता असून २३ ऑक्टोबर रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासाठी २० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28
महाराष्ट्रात हवामानात पुन्हा बदल
गेल्या काही दिवसांपासून काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी आता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागांमध्ये हवामानात पुन्हा बदल होणार आहे. पावसाचा जोर वाढणार असून वादळी वारे आणि विजांचा इशारा देण्यात आला आहे.
38
कोकण विभागात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
पालघर – हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग – वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर – वादळी वारे व विजांसह पावसाचा अंदाज
घाटमाथा भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता
संपूर्ण विभागासाठी यलो अलर्ट
58
मराठवाड्यात कोणत्या भागात पाऊस?
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली – हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस
बीड, नांदेड, लातूर, धाराशिव – विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता
या चार जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट
68
उत्तर महाराष्ट्राची स्थिती
धुळे, नंदुरबार, जळगाव – हलका पाऊस
नाशिक, अहिल्यानगर व नाशिक घाटमाथा – वादळी वारे, विजांचा कडकडाट व मध्यम पाऊस
यलो अलर्ट लागू
78
विदर्भात काय स्थिती?
अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा – पावसाचा फारसा अंदाज नाही
अकोला, बुलढाणा, वाशिम – वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस
या तिन्ही जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट
88
नागरिकांसाठी इशारा
२३ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान पुन्हा एकदा अनपेक्षित वळण घेण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः विजांचा कडकडाट, झाडांचे पडणे किंवा वादळी वाऱ्यांमुळे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.