योजनेचा लाभ नियमित मिळावा आणि पात्रतेची खात्री व्हावी यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया अतिशय सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाईन करता येते.
स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शन
अधिकृत वेबसाईटला भेट द्या
https://ladakibahin.maharashtra.gov.in
"ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा" या लिंकवर क्लिक करा.
तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड भरून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
"मी सहमत आहे" या पर्यायावर क्लिक करा आणि "OTP पाठवा" निवडा.
आधार कार्डाशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि प्रक्रिया पूर्ण करा.
ही e-KYC प्रक्रिया पारदर्शकता वाढवते, आणि भविष्यातील इतर शासकीय योजनांमध्येही उपयुक्त ठरते.