
गणपती बाप्पाचे जोरदार आगमन होत आहे. या आगमनाच्या दिवशी राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसून येत आहे. आज ३ जिल्ह्यांसाठी २४ तास महत्वाचे राहणार असून या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
बाप्पाच्या आगमनासोबत पावसाचे आगमन झालं आहे. या दिवशी मुंबई आणि उपनगरात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक घाटमाथ्यावर आज पाऊस पडणार आहे. या भागात ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूरच्या काही भागात आज पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील घाटमाथ्यावर, सातारा आणि तळ कोकणातील काही भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला.