
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना 23 मे रोजी पहाटे 4.30 वाजता अटक करण्यात आली. हे दोघंही गेल्या सात दिवसांपासून फरार होते.तर वैष्णवीच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबीयांनी पुण्याच्या वारजे पोलीस ठाण्यात निलेश चव्हाण विरोधात तक्रार दाखल केली आहे. 20 मे रोजी, वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी तिचे नातेवाईक निलेश चव्हाणच्या कर्वेनगरमधील घरी गेले असता, निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकावले आणि बाळ देण्यास नकार दिला.निलेश हा वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणेचा (नणंद) मित्र आहे. तो हगवणे कुटुंबीयांच्या कौटुंबिक वादात सतत सहभागी राहिलेला आहे.
पत्नीवर स्पाय कॅमेऱ्याद्वारे नजर
निलेश चव्हाणने स्वतःच्या पत्नीचा 2019 साली स्पाय कॅमेऱ्याने आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यामुळे त्याच्यावर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
स्पाय कॅम प्रकरणाचे तपशील:
बांधकाम व्यावसायिक निलेश चव्हाणची पार्श्वभूमी