IPS Officers Transfers: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, १३ जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षक

Published : May 22, 2025, 10:09 PM IST
IPS Officers Transfers

सार

महाराष्ट्र गृह विभागाने २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. १३ जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 

मुंबई: महाराष्ट्र गृह विभागाकडून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यावेळी तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांची नवीन नियुक्ती करण्यात आली असून, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असून, बदल्यांच्या मालिकेचा हा दुसरा मोठा टप्पा आहे.

गेल्या काही दिवसांत प्रशासनाकडून बदल्यांचा धडाका सुरू आहे. १७ मे रोजी २७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांत आज पुन्हा एकदा २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत. याआधी कालच राज्य सरकारने अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

या जिल्ह्यांना मिळाले नवे पोलीस अधीक्षक:

अहिल्यानगर – राकेश ओला यांची बदली होऊन ते मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून रुजू होतील, तर त्याजागी सोमनाथ घार्गे यांची नेमणूक झाली आहे.

रायगड – रायगडच्या एसपीपदी आंचल दलाल यांची नियुक्ती झाली आहे.

कोल्हापूर – येथे आता योगेश गुप्ता हे नवे पोलीस अधीक्षक असतील.

अकोला – अर्चित चांडक यांची बदली अकोल्यात एसपी म्हणून झाली आहे.

नागपूर लोहमार्ग – मंगेश शिंदे यांची येथे नियुक्ती झाली आहे.

पालघर – यतिन देशमुख हे येथे नवे पोलीस अधीक्षक असतील.

सिंधुदुर्ग – मोहन दहिकर यांची येथे नियुक्ती झाली आहे.

बुलढाणा – निलेश तांबे यांनी येथे पदभार स्वीकारणार आहेत.

सातारा – तुषार दोषी यांची साताऱ्यात बदली झाली आहे.

लातूर – जयंत मीणा यांची येथे नेमणूक करण्यात आली आहे.

रत्नागिरी – नितीन बगाटे हे नवे एसपी म्हणून काम पाहतील.

धाराशिव (उस्मानाबाद) – रितू खोकर यांची एसपी म्हणून नियुक्ती झाली आहे.

नाशिक ग्रामीण – बाळासाहेब पाटील यांची बदली येथे झाली आहे.

इतर प्रमुख बदल्या:

महेंद्र पंडित (कोल्हापूरचे माजी एसपी) – ठाणे शहर पोलीस उपायुक्तपदी.

बच्चन सिंग – नागपूरमधील राज्य राखीव पोलीस बल क्र. ४ चे एसपी.

राजातिलक रोशन – मुंबई पोलीस उपायुक्तपदी.

विश्व पानसरे – राज्य राखीव पोलीस दल, अमरावती येथे समादेशक.

समीर शेख – मुंबई पोलीस उपायुक्तपदी.

सोमया मुंडे – संभाजीनगर, परिमंडळ १ चे उपायुक्त.

सौरभ अग्रवाल – पुणे गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्त.

या बदल्यांमुळे अनेक जिल्ह्यांतील पोलीस कार्यप्रणालीत नवीन दिशा आणि ऊर्जा येण्याची अपेक्षा आहे. गृह विभागाच्या या मोठ्या फेरबदलामुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेला नवसंजीवनी मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Weather Alert : थंडीचा हाहाकार! महाराष्ट्रात बुधवारी कोल्ड वेव्हचं महासंकट! या 11 जिल्ह्यांना 'अलर्ट'
शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!