Vaishnavi Hagawane Case : वैष्णवीने दिलं 51 तोळे स्त्रीधन, हगवणेंनी काय केलं? फॉर्च्युनर कारसह धक्कादायक खुलासे!

Published : May 22, 2025, 10:26 AM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

Vaishnavi Hagawane Case : राज्यात सध्या पुणे येथील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत आहे. चित्रा वाघ यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशातच आता काही धक्कादायक खुलासे या प्रकरणात झाले आहेत.

Vaishnavi Hagawane Case :  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुळशीतील नेते राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्यावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर वैष्णवी हगवणेच्या छळ आणि संशयास्पद मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप झाले आहेत. 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी, तिच्या मृतदेहावर आढळलेल्या मारहाणीच्या खुणांमुळे खून झाल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.

वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शशांकने लोखंडी पाइपने तिच्यावर मारहाण केली होती. शवविच्छेदन अहवालातही तिच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आरोपींची पोलिस कोठडीत वाढ या प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा हे सध्या पोलिस कोठडीत असून, 26 मेपर्यंत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

वैष्णवीच्या स्त्रीधनाचा गैरवापर? विवाहात वैष्णवीला 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि इतर दागिने स्त्रीधन म्हणून देण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात समोर आले की, हे संपूर्ण सोनं खासगी बँकेत तारण ठेवण्यात आले आहे. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. तसेच, हगवणे कुटुंबाच्या बँक लॉकरवर बंदी आणण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

फॉर्च्युनर कार आणि दुचाकी जप्त वैष्णवीच्या नावे असलेली फॉर्च्युनर कार आणि दुचाकी पोलिसांनी पंचनाम्याद्वारे जप्त केली आहे. त्याचबरोबर लोखंडी पाइप, गळफास घेण्यासाठी वापरलेली साडी, स्टूल यासह अन्य पुरावेही पोलिसांनी जप्त केले आहेत. आतापर्यंत सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, गुन्ह्यातील कलमेही अधिक गंभीर करण्यात आली आहेत.

न्यायासाठी लढा या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी अनेक महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले आहेत. पोलिस व सरकारी यंत्रणांवर दबाव वाढत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!