नागपुरातील तिसऱ्या रिंगरोडसाठी 17000 कोटींची तरतुद - CM Devendra Fadnavis , ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते लोकार्पण!

Published : Sep 13, 2025, 08:13 AM IST

Union Minister Nitin Gadkari : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे 'ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला'चे लोकार्पण करण्यात आले.

PREV
14
20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, हा पूल नागपूरकरांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे 20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत होणार आहे. बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरु होणारा हा उड्डाणपुल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत 2.85 किमी लांबीचा आहे. नागपूर शहरातील सर्वात वर्दळीचा हा उड्डाणपूल असून वाडी पोलीस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उ्डडाणपूल 1.95 किमी लांबीचा आहे. उड्डाणपुलाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने करण्यात आले असून, यामार्फत त्यांच्या अद्वितीय ज्ञानसाधनेचे आणि भविष्यवेधी कार्याचे स्मरण अधिक दृढ होईल.

24
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर आणि विदर्भातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. कामठी रोडवरील डबल डेकर पूल हा जगातील सर्वात लांब पूल ठरून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरा रिंग रोड आणि 'नवीन नागपूर' प्रकल्पांच्या जमीन अधिग्रहणासाठी ₹17,000 कोटींच्या तरतुदीसह मोठ्या गुंतवणुकीचे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

34
नागपूर स्मार्ट सिटी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हे तंत्रज्ञान आणि फिनटेक हब म्हणून विकसित होत आहे. तसेच येथे संत्रा प्रक्रिया उद्योग, राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क, ₹30,000 कोटींच्या गुंतवणुकीसह कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, सौर मॉड्युल निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गुंतवणुकीतून लाखो रोजगार निर्माण होणार असून, नागपूर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येईल.

44
नागपूरच्या प्रगतीला वेग

फ्लॅश बससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाहतूक सुविधा रिंगरोडवर सुरू होणार असून, नागपूरच्या प्रगतीला वेग देणार आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि मजबूत पायाभूत सुविधा नागपूरला औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासाचे केंद्रस्थान बनवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Read more Photos on

Recommended Stories