तुकाराम मुंढेंनी शालेय आहारात घातलं लक्ष, या जाहिराती बंद करण्याचे दिले आदेश

vivek panmand   | CMS
Published : Jul 29, 2026, 06:45 PM IST
Tukaram Mundhe

सार

अन्न आणि औषध प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळा परिसराच्या ५० मीटर अंतरावर हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त जंक फूडच्या विक्रीवर आणि जाहिरातींवर बंदी घातल्याची घोषणा केली आहे. या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनावर असेल.

गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणारा आहार हा स्वच्छ असायला हवा म्हणून मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

काय म्हणाले तुकाराम मुंढे? 

पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, राज्यातील एक लाख शाळांमध्ये विद्यार्थी शिकत आहे. त्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास २ कोटींहून जास्त आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या दर्जाचा आहार मिळायला हवा. तो त्यांचा हक्क आहे.

जंक फूडवर घातली बंदी 

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी जंक फूडवर बंदी घातल्याची माहिती दिली आहे. शाळेच्या परिसरापासून ५० मीटरच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा पदार्थांच्या जाहिराती करण्यास शाळेच्या परिसरात बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन होत आहे का नाही याची तपासणी करण्याची जबाबदारी शाळा प्रशासनाची असणार आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक