Thane : घोडबंदर रोडवरील भीषण अपघातात तरुणीच्या शरीराचे दोन तुकडे; निधनाने परिसरात हळहळ

Published : Jul 16, 2025, 08:41 AM ISTUpdated : Jul 16, 2025, 08:55 AM IST
Accident

सार

ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका 21 वर्षीय तरुणीचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे. 

ठाणे – ठाण्यातील घोडबंदरवर पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर खड्डे पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा घोडबंदर रोडवरील नागला बंदर परिसरात रविवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात झाला. या अपघातात २१ वर्षीय गजल तुटेजा या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. कॅडबरी जंक्शनजवळ स्कुटीवरून जात असताना ती एका डंपरच्या चाकाखाली आली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते.

गजल तुटेजा ही घोडबंदर परिसरातील एका सोसायटीत राहत होती आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. वडील नसल्याने घराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. आई आणि लहान भावाचा आधार असलेल्या गजलने नोकरीसह पोळी-भाजी विक्री करून घर चालवले होते. तिचा लहान भाऊ अक्की हाच तिचा जीव होता.

रविवारी रात्री १० वाजता गजल पेट्रोल पंपाजवळून स्कुटीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे तिचे वाहन नियंत्रणाबाहेर गेले आणि ती थेट डंपरखाली गेली. डंपरच्या चाकाखाली आल्याने तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले. अपघातानंतर कुणालाच तिच्या मृतदेहाजवळ जायची हिम्मत होत नव्हती. अखेर तिची आई आणि भाऊ घटनास्थळी आले, आणि आईने चादरीत गुंडाळून गजलचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवला.

गजलने अपघाताच्या काही मिनिटे आधीच आपल्या भावाला "मी दोन मिनिटांत खाली येते, आपण बाहेर जेवायला जाऊ" असे सांगितले होते. पण तिच्या भावाला जे वाट पाहत होता, त्याला रस्त्यावर गर्दी दिसली आणि तीच बहिण अपघातात मृत झाल्याचे पाहून त्याचा जगच कोसळला.

स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. नागला बंदर परिसरातील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, मोठमोठे खड्डे आणि असमतल रस्तेमुळे अपघात घडल्याचे बोलले जात आहे. वाहतूक पोलिसांनीही ही शक्यता व्यक्त केली आहे.

गजलच्या जाण्याने संपूर्ण घोडबंदर परिसरात शोककळा पसरली आहे. तिच्या मेहनतीने उभ्या राहिलेल्या संसाराचा डाव अर्धवटच राहिला. प्रशासनाने रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Nagpur Smart City Case : स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढेंना क्लीन चिट; ईओडब्ल्यू व पोलिसांचा अहवाल विधानसभेत सादर
BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात