ऐन दिवाळीत एसटी प्रवाशांची तारांबळ होणार!, १३ ऑक्टोबरपासून ST कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, काय आहेत मागण्या जाणून घ्या

Published : Oct 06, 2025, 06:13 PM IST

ST Bus Andolan News: महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. सुमारे 4000 कोटींच्या थकीत मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

PREV
16
एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आंदोलनाचा एल्गार

मुंबई: दिवाळीच्या तोंडावर एस.टी. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत आंदोलनाचा एल्गार केला आहे. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाची घोषणा केली असून, एस.टी. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

26
काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?

महागाई भत्त्याचा फरक (2016 पासून) – 1100 कोटी रु.

वेतनवाढीचा फरक – 2318 कोटी रु.

दिवाळी भेट – प्रत्येकी 17,000 रु.

सण उचल – 12,500 रु.

एकूण थकीत रक्कम – सुमारे 4000 कोटी रु.

(प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वाट्याला सरासरी 3.77 लाख रुपये येतात) 

36
‘मशाल मोर्चा’ने सुरूवात, आंदोलनाची तीव्रता वाढणार

12 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजता दादरच्या टिळक भवन येथे "मशाल मोर्चा" काढून आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या मोर्चाचे पुढे रूपांतर बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार असून, त्याचा थेट परिणाम एस.टी. प्रवासावर होऊ शकतो. 

46
संघटनेचा प्रशासनाला इशारा

श्रीरंग बरगे, सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, "जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल व त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील." त्यांनी आरोप केला की, “ही रक्कम कर्मचाऱ्यांना न देता ती हडप करण्याचा डाव प्रशासन रचत आहे.” 

56
प्रवाशांनो सावधान! दिवाळीत प्रवासावर परिणाम होण्याची शक्यता

या आंदोलनामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतूक पर्यायांचा विचार करावा लागू शकतो. 

66
मागण्या पूर्ण न झाल्यास, राज्यभरात बेमुदत आंदोलन

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या हजारो कोटींच्या थकीत मागण्या पूर्ण न झाल्यास, राज्यभरात बेमुदत आंदोलन होणार! प्रवाशांची गैरसोय टाळायची असेल, तर प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories