MHADA Tardeo Flats: म्हाडाने ताडदेव येथील महागड्या घरांसाठी लॉटरी पद्धत रद्द करून 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर थेट विक्री योजना जाहीर केली. इच्छुक खरेदीदार आता ऑनलाइन अर्ज करून थेट घर खरेदी करू शकतील, ज्याचा देखभाल खर्चही म्हाडा उचलणार आहे.
मुंबई: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी! म्हाडाने (MHADA) एक नवी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ताडदेव येथील महागड्या घरांसाठी यावेळी लॉटरी न घेता ‘फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वावर थेट विक्री केली जाणार आहे.
28
ताडदेवमधील कोट्यवधींची घरे आता थेट विक्रीसाठी उपलब्ध
ताडदेवमधील प्राइम लोकेशनवर असलेल्या क्रिसेंट टॉवरमधील ही घरे 6 ते 7 कोटी रुपयांदरम्यान आहेत. ही घरे याआधी दोन वेळा लॉटरीत टाकण्यात आली होती, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे म्हाडाने आता थेट विक्रीचा मार्ग स्वीकारला आहे.
38
कोणत्याही लॉटरीशिवाय, थेट पैसे भरा आणि घर घ्या
नव्या निर्णयानुसार, इच्छुक खरेदीदारांना कोणतीही अतिरिक्त कागदपत्री प्रक्रिया न करता थेट रजिस्ट्रेशन करून घर खरेदी करता येणार आहे. यासाठी म्हाडा लवकरच स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करणार असून, नोंदणीसाठी तारीख आणि वेळ निश्चितपणे घोषित केली जाईल.
घर खरेदीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असेल. कोणतीही मध्यस्थी किंवा अतिरिक्त अटी नसल्याने प्रक्रिया पारदर्शक असेल. ज्याचा अर्ज आधी येईल, त्याला घर मिळेल अशा पद्धतीने संपूर्ण विक्री प्रक्रिया पार पडणार आहे.
58
खर्च म्हाडाचा, ग्राहकाला केवळ मूळ किंमत द्यावी लागेल
या घरांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च म्हाडा स्वतः उचलणार आहे. यापूर्वी लॉटरीद्वारे घर घेणाऱ्यांवर जो महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च टाकला जात होता, तो आता ग्राहकांवर नसेल. त्यामुळे घराच्या मूळ किंमतीतच व्यवहार करता येईल.
68
का झाली ही योजना लागू?
2022-23 मध्ये एका खासगी विकसकाकडून म्हाडाला ही घरे मिळाली होती. दोनदा लॉटरी करूनही विक्री न झाल्याने म्हाडा ही घरे कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवास म्हणून वापरणार होता, मात्र तो प्रस्ताव पुढे गेला नाही. अखेर, मर्यादित खरेदीदार आणि उच्च किंमतीमुळे पारदर्शक पद्धतीने विक्रीसाठी ही नवी योजना राबवण्यात येत आहे.
78
लवकरच जाहिरात जाहीर होणार, संधी गमावू नका!
म्हाडाकडून यासंदर्भातील अधिकृत जाहिरात काही दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. इच्छुकांनी म्हाडाच्या वेबसाइटवर लक्ष ठेवावे आणि नोंदणीसाठी सज्ज राहावे.
88
आधी अर्ज करणाऱ्यांना थेट खरेदीसाठी उपलब्ध
ताडदेवमधील कोट्यवधींची घरे आता लॉटरीशिवाय, फक्त सर्वात आधी अर्ज करणाऱ्यांना थेट खरेदीसाठी उपलब्ध! घर घेण्याची ही सुवर्णसंधी गमावू नका.