मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी जलकुंभावर चढून आंदोलन केले. आरोपी वाल्मीक कराडला खून प्रकरणात सहआरोपी करून त्याच्यावर मोक्का लावावा ही त्यांची मागणी होती.
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. त्यातच संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला खून प्रकरणात सहआरोपी करून त्याच्यावर मोक्का लावावा या मागणीसाठी ग्रामस्थांसह मस्साजोग येथील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले होते. मात्र मनोज जरांगे पाटील आणि पोलिसांच्या विनंती नंतर धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेण्यात आले आहे. तब्बल ४ तासानंतर धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या केल्याच्या घटनेला आता महिना उलटून गेला आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे, आणि वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोपींना मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असली तरी, काही संशयीत व्यक्तींवर अद्याप कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे. आंधळे याला तत्काळ अटक करावी. तसेच वाल्मीक कराड याला संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सहआरोपी करून मकोका लावावा अशी मागणी भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे. या मागणीला घेऊन मस्साजोगचे ग्रामस्थ देखील आक्रमक झाले आहेत.
आणखी वाचा- नाशिकमध्ये ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात 8 ठार, अनेक जखमी
धनजंय देशमुख यांच्या आंदोलनस्थळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आले आहेत. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह आंदोलक ग्रामस्थांना जरांगे यांनी खाली उतरण्याची विनंती केली होती. विशेषतः, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आले असून, तो सध्या सीआयडी कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर मोक्का लावण्यात आलेला नाही, यामुळे ग्रामस्थांची असंतोषाची भावना प्रकट झाली आहे. या कारणामुळे, १३ जानेवारीला ग्रामस्थांद्वारे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आले होता. तर १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आला होता. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, वाल्मिक कराड याच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि मोक्का लावावा, तसेच आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी. यासोबतच, शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती केली जावी. तसेच, SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत यांची नियुक्ती होण्याची मागणी देखील केली आहे.
आणखी वाचा- संतोष देशमुख हत्या प्रकरण: सर्व आरोपींवर मोक्का, पण वाल्मिक कराडवर का नाही?