महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील द्वारका सर्कल येथे रविवारी रात्री उशिरा टेम्पो आणि ट्रकची धडक होऊन आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले, अशी माहिती मिळाली आहे. अय्यप्पा मंदिराजवळ सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात झाला.
"येथील सिडको परिसरातून निघालेल्या टेम्पोमध्ये 16 प्रवासी होते. ते निफाड येथील एका धार्मिक कार्यक्रमातून परतत होते. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. काही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी, रहिवासी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींवर जिल्हा रुग्णालयात आणि काही खासगी सुविधांमध्ये उपचार सुरू आहेत.
काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.