PSI कासले, कराडचा एन्काऊंटर ते पुणे विमानतळावर दाखल, अखेर हकालपट्टी

Published : Apr 18, 2025, 01:47 PM ISTUpdated : Apr 18, 2025, 05:50 PM IST
ranjit kasale

सार

पीएसआय रणजित कासले यांनी वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची ऑफर मिळाल्याचा आरोप केला आहे. गुरुवारी पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना स्वारगेट येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आणि पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली.

महाराष्ट्र पोलीस दलातून एक ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याची मला ऑफर मिळाली होती, असा घणाघाती आरोप पीएसआय रणजित कासले यांनी केला होता. तो गुरुवारी पोलीस विमानतळावर दाखल झाला होता, त्यानंतर त्याला स्वारगेट येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. त्याची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या हत्याकांड करवून आणण्याचा दावा करण्यात आला होता असा आरोप कासले यांनी केला होता. कासले हे बीडच्या पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत होते. हा दावा केल्यानंतर सायबर विभागात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास करण्याच्या नावाखाली ते दुसऱ्या राज्यात गेले होते. यासाठी त्यांनी कुणाचीही परवानगी घेतली नव्हती. तिकडं गेल्यावर त्यांनी आरोपीकडून लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.

याबाबतची महोतो सोशल मीडियावर त्यांनी दिली होती. दिल्लीतील पबमधील डान्सचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. त्यानंतर आपण पोलिसांना शरण येणार असल्याचं त्यांनी म्हटलं होत. काल अचानक ते पुणे विमानतळावर दाखल झाले आणि सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये ते प्रसिद्ध झाले होते. ते पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांनी त्याबद्दलची माहिती काही पत्रकारांना दिली होती होती. त्यानंतर येथे पत्रकारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठा गैरव्यहार केल्याचा आरोप केला होता. 

दरम्यान, ते स्वारगेट भागातील एका हॉटेलमध्ये राहायला होते. तेथून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पोलिस दलातून आता हकालपट्टी करण्यात आल्याचे समजते. बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांनी हकालपट्टी केली आहे. 

PREV

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय