मुंबई ते नागपूर 8 तासांत प्रवास, मे महिन्यापासून प्रवाशांसाठी समृद्धी महामार्ग पूर्णपणे खुला होणार

Published : Apr 18, 2025, 09:04 AM ISTUpdated : Apr 18, 2025, 09:56 AM IST
Samruddhi Expressway

सार

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : 76 किलोमीटरचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग येत्या 1 मे पासून प्रवाशांसाठी पूर्णपणे उघडण्याची शक्यता आहे. या दिवशी महाराष्ट्र दिनही साजरा केला जाणार आहे.

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway to Open : महाराष्ट्राच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणारया समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी (Igatpuri) ते ठाण्यातील (Thane) आमने येथील अखेरच्या टप्प्यातील कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) राज्य सरकारने या महामार्गाच्या उद्घाटनासाठी वेळ मागितली आहे. मेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा महामार्ग पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मुंबई ते नागपूर थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. या प्रवासाचा कालावधी आठ तासांवर येणार आहे.

समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या महामार्गातील काही टप्पे सुरु करण्यात आले असून इगतपुरी ते मुंबई दरम्यानचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. इगतपुरी ते ठाण्याजवळ असलेल्या काही भागांमध्ये काही कामे अपूर्ण असल्याने तो पूर्णपणे खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे याचे लोकार्पण खोळंबले होते. विधानसभा निवडणुकांपूर्वी तो खुला करण्याचे राज्य सरकारचे नियोजन होते. परंतु, खर्डी येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने तो खुला करता आला नाही. केवळ खर्डी येथील पुलाचेच नव्हे तर आमने येथून पुढे वडपेला जाण्यासाठी तयार करण्यात येणारया पुलाचेही काम अपूर्ण होते.

फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरु करण्यात येणार होता. परंतु, वडपे येथे नाशिक रस्त्याला जोडणारा कनेक्टरचे कामही अपूर्ण राहिल्याने तो वेळेत खुला करता आला नाही. अद्यापही ठाणे ते वडपे येथील काही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे मे मध्ये तो खुला करण्यात आला तरी अडथळ्यांचा प्रवास राहणार असून पूर्णपणे सुरु करण्यास आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल
Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक