
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेकडून ओव्हरनाइट ब्लॉकची घोषणा वसई रोड-वैतरणा स्थानकादरम्यान घेतला जाणार आहे. यामुळे शनिवारी पहाटे सुटणाऱ्या गाड्यांवर या ब्लॉकचा परिणाम होणार असून काही गाड्या थोड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
ओव्हरनाइट ब्लॉक संदर्भातील अपडेट सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरील अकाउंट @drmbct यांच्याकडून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द होणार आहेत. याशिवाय अप आणि डाउन मार्गावरील गाड्यांना ब्लॉकचा फटका बसणार आहे. यामुळे नागरिकांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे अशी सुचना देण्यात आली आहे.
ब्लॉकदरम्यानचे वेळापत्रक :
18 एप्रिल, शुक्रवारी ते 19 एप्रिल शनिवारी, 2025
वेळ : रात्री 11.50 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत
स्थळ : वसई रोड ते वैतरणा स्थानक
प्रवाशांना सुचना
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी स्टेशन मास्टर्सना गाड्यांच्या वेळापत्रकाबद्दल विचारावे. याशिवाय ब्लॉकमुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. पण ब्लॉकवेळी नागरिकांना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.
लोणावणा आणि मळवलीदरम्यान पॉवरब्लॉक
मध्य रेल्वेकडून 18 एप्रिलपासून ते 20 एप्रिलपर्यंत लोणावळा ते मळवलीदरम्यान स्पेशल ट्राफिक आणि पॉवरब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी चार स्टील गर्डरचे काम केले जाणार आहे. यामुळे गाड्यांच्या वाहतूकीवर परिणाम होणार आहे. अशातच प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून पहावे अशी सूचना देण्यात आली आहे.