
Sanjay Raut Press Conference : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार फुटणार असल्याच्या चर्चांना राज्यात उधाण आले आहे. 9 पैकी 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. याच सर्व गोष्टींवर स्पष्टपणे भाष्य करण्यासाठी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत आणि अनिल देसाई उपस्थितीत होते.
पत्रकार परिषद सुरू होताच संजय राऊत यांनी म्हटले की, आपण नेहमी सकाळी 10 वाजता येतो. पण आज माझ्यासोबत शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई , नाशिकचे खासदार राजाभाऊ गोडसे आहेत. आपण सर्वजण ऐवढ्या मोठ्या संख्येने येथे जमलो आहोत याचे कारण तुम्हाला आणि मला देखील माहिती आहे.
कालपासून ज्या अफवा किंवा बातम्या सर्वत्र प्रसिद्ध होतायत की, ऑपरेशन टायगर सुरू आहे. हे सोप्पं नाहीये. यामुळे मूळात त्यांनी मान्य केले आम्ही टायगर आहोत. यावेळी संजय राऊत यांनी शिंदे यांची शिवसेना किंवा एकनाथ शिंदे नाव न घेता निशाणा साधला. खरंतर, आमच्यापर्यंत ऑपरेशन टायगरसंदर्भातील कोणत्याही घडामोडींची अधिकृत माहिती नाही.
तुमच्या माध्यमातून आम्ही बातम्या पाहतोय आणि प्रतिक्रिया देत आहोत. काल रात्री १०.३०-११ च्या सुमारास एका महत्वाच्या व्यक्तीकडून सांगण्यात आले की, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतले जात आहे. यावेळी संजय राऊतांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. याशिवाय खासदारांना विकत घेण्याचा हमीभाव तोच 50 कोटी असल्याचे संजय राऊतांनी म्हटले. मात्र रात्रीपर्यंत खासदारांना 15 कोटी दिले जात आहेत. तरच ते खासदार दिल्लीत पाऊल ठेवतील अन्यथा येणार नाहीत असे सांगण्यात आले.
अशापद्धतीने कोणी कुठे तृणमूल काँग्रेस, शिवसेना किंवा अन्य कोणताही पक्ष फोडले जात असतील तर या देशात निवडणूका घेण्याचा काहीही अर्थ नाही. ज्या आमच्या खासदारांनी नावे समोर येत आहेत ते कुठेत हे मला माहिती नाही. हे सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत.
मात्र आधी ज्यावेळी फूट पडली तेव्हा असे सांगण्यात येत होते की, हा उद्रेक नव्हे तर बंड आहे. याशिवाय मोदींच्या नावावर मतं मागण्यात आली आणि तुम्ही निवडून आलात. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरू आहे. पण हे खासदार किंवा आमदार असले तरीही पूर्णपणे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आले आहेत. खासकरुन उद्धवजींच्या मेहनतीवर निवडून आले असताना कोणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. मात्र गेल्यावेळी जसे बंड झाले त्याची पुर्नावृत्ती होणार असेल तर महाराष्ट्र गप्प बसणार नाही.जो काही राडा व्हायचा आहे तो होईल. जी डरपोकगिरी ज्याला शिवसेनेच्या भाषेत नादानपणा म्हणतात तो खपवून घेतला जाणार नाही.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत लोकसभेचे चार खासदार उपस्थितीत होते आणि उर्वरित पाचजण व्हिडीओ कॉन्फेरेंन्सिंगद्वारे उपस्थितीत होते. यावेळी एका खासदारने तर तीन मिनिटांत चारवेळा साईबाबांची शपथ घेतली. कोणी आई भवानीची शपथ तर कोणी मुलीची,आईची आणि मुलाची शपथ घेतली. कोणी बाळासाहेबांची देखील शपथ घेतली. यावर विश्वास ठेवणे मुश्किल आहे. याशिवाय जी लोक पक्ष बदल करतायत त्यांना देखील कठोर शब्दांत संजय राऊत यांनी सुनावले.
#WATCH | Delhi | Amid speculations of a split in Shiv Sena UBT, party MP Sanjay Raut says, "I have information that Rs 15 crore each was delivered to the MPs, after which they boarded charter flights from three places, including Nanded and Pune. We have issued a whip for the… pic.twitter.com/s50XxiJV3E
— ANI (@ANI) June 17, 2026
तर उद्या शिवसेनेची उद्या दिल्लीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी अरविंद सावंत यांनी व्हिप जारी केला आहे.
A meeting of all the Lok Sabha members of Shiv Sena (UBT) will be held on June 18, 2026, at 11 00 AM, at the Parliamentary Party Office in Delhi. pic.twitter.com/KhrWjTiLBK
— ANI (@ANI) June 17, 2026