
मुंबई : महाराष्ट्रात शरद पवारांच्या गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पोलिसांनी कथित रुपात रेव्ह पार्टीतून अटक केली आहे. प्रांजल खेवलकर असे त्यांचे नाव असून ते रोहिणी खडसे यांचे पती आहेत. प्रांजल यांच्या अटकेनंतर रोहइणी खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहिणी खडसे यांनी पतीला करण्यात आलेली अटक चुकीची असून सत्य लवकरच समोर येईल असे मोजक्याज शब्दात उत्तर दिले आहे.
शरद पवारांच्या पक्षातील महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या पतीला रविवारी (27 जुलै) पुण्यातील एका रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. यावर रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “मला कायदा आणि व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. वेळच समस्येचे उत्तर आहे. योग्य वेळी सत्य समोर येईल. जय महाराष्ट्र.”
हनी ट्रॅपच्या आरोपांवरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये अद्याप वाद सुरू आहे. अशातच पुण्यातील एका पार्टीमुळे वाद चिघळला गेला आहे. पोलिसांनी रविवारी एका रेव्ह पार्टीवर छापेमारी केली. या पार्टीवरील कारवाईमध्ये रोहणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यातील राजकरणही तापले गेले आहे.
सात जणांना अटक
पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केली आहे. या सर्वांवर असा आरोप लावण्यात आला आहे की, यांच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. कोर्टाने या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांच्यासह सात आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल आहे.
दरम्यान, ही पार्टी 26 जुलैला रात्री पुण्यातील खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू झाली होती. पोलिसांच्या मते, 25 जुलैला देखील अशीच एक पार्टी झाली होती. प्रांजल खेवलकर यांनी तो फ्लॅट चार दिवसांसाठी बुकिंग केला होता. यामुळेच पुणे पोलिसांकडून शुक्रवारी (25 जुलै) झालेल्या पार्टीचाही तपास केला जाणार आहे. यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही तपासून पाहिले जातील.