
Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभाग IMD ने कोकण, घाटमाथा आणि विदर्भ या क्षेत्रांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात विजांबरोबर पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
त्याचबरोबर पुणे, सातारा, आणि रायगड यांसारख्या घाटावरच्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे नदी काठाच्या भागात तसेच रोडवर पाण्याच्या साचण्याचा धोका असल्याचा इशारा दिला आहे
पुणे आणि आसपासच्या घाट परिसरामध्ये ताम्हणी घाटाला २४ तासात २८० मिमि पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, कोयना आणि लोणावळा या ठिकाणीदेखील जोरदार पाऊस झाला असून, त्यामुळे जलसाठा लवकर भरत चालला आहे. खडकवासला धरणात साठा सुमारे ८७ टक्के पाणीसाठा झाला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इथे काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे; विशेषतः समुद्रकिनारी भागात उच्च लाटांची शक्यता असल्यामुळे त्यांना वेळेत खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पुणे, रायगड, सातारा, नाशिक, जळगांव आणि धुळे या जिल्ह्यांतदेखील यलो ऑरेंज अलर्ट जारी होऊन पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. समुद्र व घाटांबरोबरच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे जनजीवन प्रभावित होऊ शकते. एकंदरीत, पुढील २४ ते ४८ तास महाराष्ट्राच्या विविध भागांत धोकादायक हवामानाची परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर जाणे टाळावे, गरजेनुसार प्रवास करा आणि बदलत्या हवामानाकडे लक्ष ठेवा, अशा सूचना स्थानिक प्रशासन आणि हवामान खात्याने दिल्या आहेत.