खडसेंच्या जावयाचा ठरवून झाला गेम, कट रचून पब केला बंद, वकिलांनी केला दावा

Published : Jul 28, 2025, 10:20 AM ISTUpdated : Jul 28, 2025, 12:00 PM IST
pranjal khenvalkar and rohini khadse

सार

पुणे पोलिसांनी खराडीतील एका फ्लॅटवर छापा टाकून माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई आणि एका महिला नेत्याचे पती प्रांजल खेनवलकर यांना अटक केली. त्यांच्यासह दोन महिला आणि चार पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आहे.

पुणे : मुंबई‑नगर महामार्गाजवळील खराडी भागातील एका फ्लॅटवर पुणे पोलिसांनी छापा टाकला होता. या हाऊस पार्टीत अमली पदार्थ, हुक्का व दारूचा वापर होत असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी प्रांजल खेवलकर आणि सहा जणांना अटक केली. त्यात दोन महिला आणि चार पुरुषांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं.

प्रांजल हे रोहिणी खडसे यांचे पती

प्रांजल हे माजी मंत्री एकनाथ खडसेंचे जावई असून, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. ह्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले असून, मीडिया तसेच नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. पोलिसांच्या तपासात या पार्टीत सापडलेले २.५ ग्रॅम कोकेन, सुमारे ७० ग्रॅम गांजा, हुक्का फ्लेव्हर्स, दारूच्या बाटल्या आणि इतर मद्यपदार्थांचा समावेश आहे. पोलिसांनी नंतर प्रांजल यांच्या हडपसर येथील बंगल्यावरून लॅपटॉप, तीन पेन ड्राइव आणि एक हार्ड डिस्क जप्त केली.

प्रतिक्रिया आली समोर 

एकनाथ खडसे यांनी या घटनाबाबत पहिल्यांदा प्रतिक्रिया देत सांगितले की, तपास अहवाल आणि फॉरेन्सिक रिपोर्ट नंतरच स्पष्टपणे बोलणार आहेत. जर खरे दोषी आढळले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होईल; पण जर कुणाला अन्यायाने अडकवण्यात आले असेल तर, तो प्रकारही सहन केला जाणार नाही, असा त्यांनी म्हटलं आहे.

आमदार रोहित पवार काय म्हणाले? 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याच्या अटकमुळे राजकीय वाद वाढले आहेत. शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी आरोप केला की, “जे सरकारवर बोलतात त्यांना थेट नाही तरी त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याची पद्धत सुरू झाली आहे.” राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले की, या सर्व तपास न्याय पूर्वक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा. त्यांना संशय आहे की, हा प्रकार राजकीय दबावाखाली तयार केला गेला असावा. म्हणून सर्वांना न्यायसंगत कारवाई आणि सत्य समोर येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra FDA: डॉमिनोजसह ११ हॉटेल्सवर कारवाई, परवाने रद्द
Pune Crime : 'किंग इज बॅक'... स्टेटस ठेवलं, पुण्यात 16 वर्षांच्या मुलावर कोयत्याने सपासप वार