एशियानेट न्यूज पोर्टलवर १० सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
1. नागपूर हीट अँड रन प्रकरणी ऑडी कारमधील दोघेही मद्यधुंद होते अशी पोलिसांनी कबुली दिली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या लेकाची ब्लड टेस्ट होण्याची शक्यता आहे.
2. महायुतीत अजित पवारांकडून अमित शाहांकडे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे.मात्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी हा दावा फेटाळला आहे. अमित शाहांकडे तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी केलीत का? अजित पवार एका वाक्यात म्हणाले, या सगळ्या थापा आहेत
3. विधानसभेसाठी भाजपचे 50 टक्के जागांवरील उमेदवार ठरले आहेत. नवरात्री संपल्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा संभाव्या उमेदवारांना फोन येण्याची शक्यता आहे. अजितदादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 अन् भाजपला 62-67 जागा; असा आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे.
4. काँग्रेसकडून पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला आहे. नांदेड लोकसभेच्या जागेवर दिवंगत वसंत चव्हाणांच्या चिरंजीवाचीच शिफारस करण्यात आली आहे.
5. 'देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट बघतात', गिरीश महाजन प्रकरणावरून अनिल देशमुख यांचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर 'ओ अनिलबाबू... चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हल्लाबोल केला आहे.