तासगाव गणपती उत्सवात रोहित पाटील यांचे शक्तिप्रदर्शन, आमदारकीची केली जय्यत तयारी

तासगाव येथील गणपती उत्सवात भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी विधानसभा इच्छुक रोहित पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. भाविकांनी त्यांना डोक्यावर घेतले आणि त्यांच्या घोषणांना प्रतिसाद दिला.

तासगाव येथे गणपती उत्सवाच्या दरम्यान मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. येथे यावेळी विधानसभेसाठी इच्छुक असणारे रोहित पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचं दिसून आलं आहे. येथील उजव्या सोंडेचा गणपती हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून २४४  वर्ष येथे रथोत्सव हा साजरा केला जातो आणि राज्यातून भाविक येथे उत्सवासाठी येत असतात. 

येथील रथोत्सवामध्ये भाविकांनी देवाकडे साकडे घातल्यास तो त्यांच्या इच्छा असाही सांगितलं जात. येथे पेढे, नारळ आणि प्रसाद भाविकांच्या वतीने उत्साहात उधळला जातो. या रथासमोर संस्थानाचा गणपती मोठ्या उत्साहात नेला जातो. दोरखंड बांधून हा रथ ओढला जातो. यावेळी झालेल्या जत्रेला राज्यातून भाविक आल्याचे दिसून आले. यावेळी रोहित पाटील यांना भाविकांनी डोक्यावर घेतल्याचं दिसून आलं. 

रोहित पाटील यांची भाविकांमध्ये मोठी क्रेझ - 
भाविकांमध्ये रोहित पाटील यांची मोठी क्रेझ असल्याचं दिसून आलं आहे. रोहित पाटील यांनी यावेळी सर्व उपस्थित भाविकांना गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा द्यायला सांगितलं होत. त्यावेळी उस्फूर्तपणे सर्वांनी मोरया असे म्हटले होते. येथे उपस्थित सर्व भाविक गुलालाचा न्हाऊन गेल्याच यावेळी दिसून आलं. 

Share this article