बुधवार, ११ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

एशियानेट न्यूज पोर्टलवर ११ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

vivek panmand | Published : Sep 11, 2024 2:31 AM IST / Updated: Sep 11 2024, 06:42 PM IST

1. भारतात जेव्हा जातीपातीवरून पक्षपात होणार नाही, तेव्हा काँग्रेस पक्ष आरक्षण रद्द करण्याचा विचार करेल, राहुल गांधींचे अमेरिकेत वक्तव्य, तर काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा समोर आला असल्याची अमित शाह यांनी हल्लाबोल केली आहे.

2. आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींचा खरा चेहरा पुढे आला, भाजप कधीही आरक्षण संपू देणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

3. नागपूरमधील ऑडी अपघाताचे काँग्रेस कनेक्शन समोर आले आहे. कार चालवणाऱ्या अर्जुन हावरेचे वडील जितेंद्र हावरे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. त्याचबरोबर नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे RTO अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन केले आहे. अपघातावेळी कारचा वेग 60 किमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

4. शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ आता भक्तीपीठ आणि पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गालाही ब्रेक मिळणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवले.

5. भाजपने किरीट सोमय्यांना निवडणूक कॅम्पेन कमिटीच्या सदस्यपदाची जबाबदारी दिली आहे, पण सोमय्यांनी जबाबदारी नाकारली आहे. 2019 साली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला अमित शाहांच्या पत्रकार परिषदेतून जायला सांगितले, तेव्हापासून कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय, किरीट सोमय्या यांनी खंत व्यक्त केली आहे.

Share this article