रेशन कार्डधारकांनो सावधान! १ एप्रिलपासून 'या' लोकांचे रेशन होणार बंद; सरकारची मोठी 'डिजिटल' स्वच्छता मोहीम!

Published : Mar 10, 2026, 07:12 PM IST

Ration Card New Rules: केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड अंतर्गत नवीन नियम लागू केले, ज्यामुळे १ एप्रिल २०२६ पासून अपात्र लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे. उत्पन्न, मालमत्ता, चारचाकी वाहन, ई-केवायसी यांसारख्या ७ प्रमुख निकषांवर ही कारवाई करणारय.

PREV
14
रेशन कार्डधारकांनो सावधान! १ एप्रिलपासून 'या' लोकांचे रेशन होणार बंद

मुंबई: जर तुम्ही रेशन कार्डवर धान्य घेत असाल, तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. केंद्र आणि राज्य सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये (PDS) पारदर्शकता आणण्यासाठी कंबर कसली आहे. १ एप्रिल २०२६ पासून 'वन नेशन वन रेशन कार्ड' अंतर्गत नवीन आणि कडक नियम लागू होणार असून, यामुळे देशभरातील लाखो अपात्र कार्डधारकांवर कायमची 'काट' मारली जाणार आहे. 

24
का घेतली जातेय ही कठोर भूमिका?

अनेक ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली कुटुंबे गरिबांच्या हक्काचे धान्य लाटत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे खऱ्या गरजूंपर्यंतच अनुदानित धान्य पोहोचावे, या उद्देशाने प्रशासनाने आता गाळणी प्रक्रिया (Scrutiny) सुरू केली आहे. 

34
हे '७' नियम ठरवणार तुमची पात्रता; अन्यथा कार्ड होईल रद्द!

१. उत्पन्न मर्यादा: शहरी भागात वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात २ लाखांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही रेशनसाठी अपात्र ठराल.

२. चारचाकी वाहन: जर तुमच्या घरी कार, ट्रॅक्टर किंवा इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल, तर तुमचे नाव यादीतून वगळले जाईल.

३. आयकर (Income Tax): कुटुंबातील कोणतीही व्यक्ती आयकर भरत असेल, तर त्या कुटुंबाला रेशनचा लाभ मिळणार नाही.

४. घरातील सुविधा: ज्यांच्या घरात एअर कंडिशनर (AC) किंवा जनरेटर यांसारख्या चैनीच्या वस्तू आहेत, त्यांचे कार्ड रद्द केले जाऊ शकते.

५. मालमत्तेचा निकष: शहरात १०० चौरस मीटरपेक्षा मोठा स्वतःचा प्लॉट, फ्लॅट किंवा पक्के घर असल्यास रेशन बंद होईल.

६. ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य: सर्व सदस्यांनी रेशन दुकानात जाऊन अंगठा लावून ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. हे न केल्यास कार्ड त्वरित बंद होईल.

७. खोटी माहिती: तपासादरम्यान चुकीची माहिती देऊन रेशन लाटल्याचे सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाईसह दंडही आकारला जाईल. 

44
तुमचे रेशन वाचवण्यासाठी काय कराल?

त्वरित केवायसी करा: तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार कार्डच्या मदतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

माहिती अपडेट करा: कुटुंबातील सदस्यांची संख्या किंवा उत्पन्नात बदल झाला असल्यास त्याची नोंद रेशन कार्यालयात करा.

सरकारच्या या निर्णयामुळे 'बोगस' रेशन कार्डधारकांचे धाबे दणाणले असून, खऱ्या अर्थाने गरीब कुटुंबांना आता जास्त धान्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories