Capsicum Farming : ढोबळी मिरचीच्या (Capsicum Crop) शेतीतून वर्षाला चार कोटी रुपये कमावणे ही काही साधी गोष्ट नाही. त्यातही एका पंचवीस वर्षांच्या तरुणीने हे यश मिळवले आहे. तिने आपली नोकरी सोडून शेतीत पाऊल ठेवले आहे.
पुण्याची तरुणी प्रणिता वामनने एमबीएची नोकरी सोडून शेती सुरू केली. जिद्द आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तिने स्वतःच्या गावातच मोठे यश मिळवले आहे. आता तिचे नाव जागतिक पातळीवर पोहोचले आहे.
25
वडिलांचा पाठिंबा आणि सरकारी मदत
वडिलांच्या पाठिंब्याने प्रणिताने 2020 मध्ये पॉलीहाऊस शेती सुरू केली. सरकारी अनुदानाचा फायदा घेत तिने पहिल्याच वर्षी 40 टन उत्पादन घेतले. त्यातून तिला भरघोस नफा मिळाला. त्यातून तिचा आत्मविश्वास वाढला.
35
बेल पेपर्सचीही लागवड
शिमला मिरचीसोबतच लाल आणि पिवळ्या बेल पेपर्सची लागवड करून तिने नफा वाढवला. 25 एकरात शेती विस्तारून तिने 4 कोटींची उलाढाल केली आणि 2.25 कोटींचा नफा कमावला. म्हणजे तिने ५० टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. आयटी अभियंत्याचेही एवढे पॅकेज नसते.
प्रणिता आपले पीक जयपूर, नाशिक, दादर येथील घाऊक व्यापाऱ्यांना थेट विकते. पीक तयार होण्याआधीच ऑर्डर घेत असल्याने तिला मार्केटिंगची कोणतीही अडचण येत नाही. तिच्या मालाला भावही चांगला येतो.
55
पॉलीहाऊसमुळेच यश शक्य झाले
पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीला चांगला भाव मिळतो. एकरी 8-10 लाखांच्या गुंतवणुकीवर 20-22 लाखांचा नफा मिळत असल्याने हा व्यवसाय फायदेशीर ठरला आहे. आता परिसरातील शेतकरी तिचे अनुकरण करत आहेत.