Maharashtra Rain Alert: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन होत आहे. हवामान विभागाने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना, मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला, राज्याच्या इतर भागातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे
मुंबई: धो-धो बरसल्यावर काही काळ विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रावर हजेरी लावत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केला असून अनेक भागांत पावसाचं जोरदार पुनरागमन होणार आहे. पूर्व विदर्भातून पावसाची सुरुवात होत असून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढत जाणार आहे. हवामान खात्याने विदर्भातील सर्व जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
26
मुंबई आणि कोकणात हलक्या सरी
मुंबईत ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहील. कोकणातही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
36
पश्चिम महाराष्ट्रात मिसळलेला अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली जिल्ह्यांमध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मध्यम पावसाची शक्यता असून नंदुरबार, धुळे, अहिल्यानगर, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे. तापमानाचा पारा 30 अंशांवर स्थिर असून किमान तापमान 25 अंशांदरम्यान राहील.
56
मराठवाड्याच्या काही भागांना अलर्ट
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
66
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. पुढील तीन दिवस या भागात पावसाची जोरदार सक्रियता राहणार असून मुसळधार सरींचा इशारा दिला गेला आहे.