Pune Water Cut: गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या का आणि कुठल्या भागात?

Published : Oct 28, 2025, 07:12 PM IST
Pune Water Cut

सार

Pune Water Cut: पुण्यात येत्या गुरुवारी, 30 ऑक्टोबर रोजी, पर्वती व लष्कर जलकेंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! येत्या गुरुवारी, 30 ऑक्टोबर, शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती व लष्कर जलकेंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठा लाईनमध्ये आवश्यक दुरुस्ती व देखभाल कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पूर्वसूचना देत पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे, तसेच पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

पाणीपुरवठा का थांबणार?

पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राकडे जाणाऱ्या पाणीवाहिनीत गळती दुरुस्ती करण्याचे काम नियोजित आहे. या दोन जलकेंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरू केला जाईल.

पाणीपुरवठा बंद राहणारे प्रमुख भाग

लष्कर भाग

सोलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, माठवाडी, गोकुळ नगर, ससाणे नगर, काळेवाडी, मुण्डवा, भोसलेनगर, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, सोवळेवाडी, बी. टी. कवडरोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, मोहम्मदवाडी, साडेसतरा नळी, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर व उरुळी देवाची (बेकर हिल टाकी).

खाराडी भाग

खाराडी भाग, आपले घर, भाईनगर बस्ती, चौथी वस्तीसह संपूर्ण खाराडी परिसर, चंदन नगर, बोराटे नगर, यशोदा नगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, साईसृष्टी नगर, मधुबन नगर, भोसलेनगर व माळवाडी परिसर.

भामा आसखेड योजना

शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक आणि पोटे नगर.

पुणेकरांसाठी महत्वाची सूचना

पाणी पुरवठा बंद असलेल्या दिवशी जरुरीनुसार पाणी साठवून ठेवा.

पाणी जपून आणि काटकसरीने वापरणे अत्यावश्यक आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!