पुणे रेल्वे विभागात सध्या एकूण १७०० कोटी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये खालील महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.
नवे फलाट आणि विस्तार: रिमॉडलिंग आणि नवीन ६ फलाटांच्या निर्मितीसाठी ४०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हे काम पुढील आर्थिक वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
टर्मिनलचा विकास: खडकी आणि हडपसर टर्मिनलच्या विकासासाठी २०० कोटींहून अधिक निधी खर्च केला जात आहे.
अमृत भारत स्टेशन: या योजनेअंतर्गत पुणे विभागातील २० स्थानकांचा कायापालट केला जात आहे.
परिसर विकास: फलाटांचे काम पूर्ण झाल्यावर स्थानक परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.