पुणेकरांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ मोठी संधी घेऊन आले आहे. तब्बल 4,186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेकांच्या डोळ्यातील घराचे स्वप्न आता साकार होणार आहे.
या सोडतीत विविध योजनांमधून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यात –
पंतप्रधान आवास योजना अंतर्गत – 219 घरे
म्हाडा गृहनिर्माण योजना – 1683 घरे
15% सामाजिक गृहनिर्माण योजना – 864 घरे
20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना – 3322 घरे
यामुळे सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत अनेकांना आपल्या बजेटमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
24
अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा
11 सप्टेंबर 2025 – दुपारी 12:30 पासून ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरण्यास सुरुवात.
31 ऑक्टोबर 2025 – अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत रात्री 11:55, तर ऑनलाईन अनामत भरण्याची वेळ रात्री 11:59 पर्यंत.
1 नोव्हेंबर 2025 – बँक RTGS/NEFT द्वारे पैसे भरणाऱ्यांसाठी शेवटची संधी.
11 नोव्हेंबर 2025 – संध्याकाळी 6 वाजता प्राथमिक यादी जाहीर.
13 नोव्हेंबर 2025 – दावे-हरकती नोंदविण्याची अंतिम वेळ दुपारी 12 पर्यंत.
17 नोव्हेंबर 2025 – अंतिम यादी प्रकाशित होईल.
21 नोव्हेंबर 2025 – दुपारी 12 वाजता सोडत प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता निकाल वेबसाईटवर उपलब्ध होईल.
34
पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रिया
या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि अर्जदारांना सोय व्हावी यासाठी अर्ज, नोंदणी, रक्कम भरणे ते सोडत काढणे – सगळे टप्पे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती तपासणे आवश्यक आहे. (म्हाडाची वेबसाईट- https://www.mhada.gov.in/en/node/17936)
पुण्यात घर घेणे अनेकांसाठी स्वप्नवत मानले जाते. महागाई, वाढते दर यामध्ये स्वतःच्या नावावर घर घेणे कठीण वाटत असले तरी या सोडतीतून ते शक्य होऊ शकते. योग्य वेळी अर्ज करून, दिलेल्या वेळापत्रकाचे पालन करणाऱ्या अर्जदारांसाठी ही संधी आयुष्यभरासाठी सोनेरी ठरणार आहे. तर पुणेकरांनो, वेळ वाया न घालवता अर्ज भरा आणि स्वतःच्या घराच्या स्वप्नाकडे एक पाऊल टाका!