खंडोबा मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता लवकरच अत्याधुनिक लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी याबाबत निर्देशही दिले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील निमगाव येथील खंडोबा मंदिर (Khandoba Temple) हे पौराणिक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी भरणाऱ्या यात्रेला दरवर्षी तीन ते चार लाख भाविक येत असतात. त्याचप्रमाणे वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या देखील भलीमोठी आहे.
त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, मुले, महिला अन्य भाविकांची मंदिरापर्यंत जाण्याची योग्य सोय होण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची (Modern Elevators) सोय करावी. त्यासाठी लागणारी शासकीय जमीन जिल्हा परिषदेला विनामोबदला उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (14 फेब्रुवारी) दिले आहेत.