Kilkari Programme : राज्यातील गर्भवती महिलांच्या सुरक्षिततेसाठी नव्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी किलकारी (Kilkari Programme) ही नवी योजना आणण्यात आली आहे. “प्रसूतीआधी, प्रसूतीनंतर, किलकारी प्रत्येक कुटुंबासोबत” हे योजनेचे ब्रीद वाक्य आहे.
दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नवी दिल्लीतून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (Union Ministers of State for Health) डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यासाठी या योजनेचे लोकार्पण केले. कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री डॉ. एस. पी. सिंग बघेल, गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल देखील उपस्थित होते.